महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अल्लू अर्जुन दुबईहून परतल्यानंतर मुलगी अर्हाने केले गोड स्वागत

अल्लू अर्जुन १६ दिवसांनंतर दुबईच्या सुट्टीवरून घरी परतला. तो घरी परतला तेव्हा तिची मुलगी अल्लू अर्हा हिने त्याचे जोरदार स्वागत केले. आपले स्वागत कसे झाले याचा फोटो अल्लू अर्जुनने चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन

By

Published : Jan 29, 2022, 12:28 PM IST

हैदराबाद (तेलंगणा): तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन नुकत्याच रिलीज झालेल्या 'पुष्पा: द राइज'च्या प्रचंड यशाचा आनंद घेत आहे. गेली 15 दिवस तो दुबईत सुट्टीवर होता. इतक्या दिवसांनी घरी परतल्यावर तिची मुलगी अल्लू अर्हा हिने त्याचे जोरदार स्वागत केले.

शनिवारी अल्लू अर्जुन १६ दिवसांनी दुबईहून घरी परतला. त्याची मुलगी अल्लू अर्हा ही कुटुंबातील सर्वात उत्साही सदस्य आहे. तिने तिच्या नाना (तेलुगुमध्ये वडील) यांचे गोड हावभावाने स्वागत केले.

अल्लू अर्जुन दुबईहून परतल्यानंतर मुलगी अर्हाने केले गोड स्वागत

अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर आपल्या मुलीने त्याचे घरी कसे स्वागत केले याचा फोटो शेअर केला आहे. अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची मुलगी फुलांनी लिहिलेल्या 'वेलकम नाना'जवळ उभी असलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना अल्लू अर्जुनने लिहिले, "परदेशातू 16 दिवसांनी परतल्यानंतर सर्वात गोड स्वागत."

अर्जुनची छोटी मुलगी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अल्लू अर्हा लवकरच समंथा रुथ प्रभूच्या आगामी 'शकुंतलम' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट पौराणिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. यामध्ये अल्लू अर्हा राजकुमार भरतच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात समंथा आणि देव मोहन मुख्य भूमिकेत आहेत.

'पुष्पा' चित्रपटाच्या संपूर्ण भारतातील यशाने आनंदित झालेला अल्लू अर्जुन दुबईत आनंदाने सुट्टी घालवत होता. त्यापूर्वी त्याने दुबई शहरातील AURA पूलच्या शेजारी उभा असलेला स्वतःचा फोटो शेअर केला होता. हे एक जागतिक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

अल्लू अर्जुन 'पुष्पा: द रूल' या 'पुष्पा २' चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. याचे स्क्रिप्ट वाचण्यापूर्वी त्याने विश्रांती घेण्याचे ठरवले आणि तो दुबईला रवाना झाला होता. अल्लू अर्जुन लवकरच सुकुमार आणि त्याच्या टीमसोबत पुष्पाच्या पुढच्या भागाचे शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज होईल.

हेही वाचा -Yrf Spy Universe: हृतिकला सलमानच्या 'टायगर 3' व Srk च्या 'पठाण'मध्ये सामील होण्यास रस नाही?

ABOUT THE AUTHOR

...view details