मुंबई - बॉलिवूडची 'चुलबुली गर्ल' आलिया भट्ट आणि हॅन्डसम हंक रणबीर कपूर यांच्या 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. २०१७मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. आज महाशिवरात्रीच्या पर्वावर या चित्रपटाचा लोगो लॉन्च करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीच्या पर्वावर आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र'चा लोगो प्रदर्शित; पाहा फोटो - अमिताभ बच्चन
'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे शूटिंग बुल्गेरीया आणि मुंबईच्या काही ठिकाणी करण्यात आले आहे. आज महाशिवरात्रीच्या पर्वावर या चित्रपटाचा लोगो लॉन्च करण्यात आला आहे.
काही दिवसांमध्ये या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे शूटिंग बुल्गेरीया आणि मुंबईच्या काही ठिकाणी करण्यात आले आहे. चित्रपटाच्या सेटवरच आलिया आणि रणबीरच्या प्रेमाच्याही चर्चा रंगल्या. रिअल लाईफ जोडी चित्रपटातही एकत्र झळकणार असल्यामुळे प्रेक्षकांनाही या चित्रपटाची आतुरता आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. तर, अयान मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अयान मुखर्जी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाच्या लोगो लॉन्चिंगदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.