महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अलिबागची बालकलाकार आर्या मोरे 'सावित्रीजोती' मालिकेत साकारतेय 'ही' भूमिका - 'सावित्रीजोती' मालिका

आर्या मोरे ही मूळची पेण मधली असून अलिबागमधील संभाजीवाडा हे तिचे आजोळ आहे.

Alibag's Child Artist Arya More play role in Savitryjyoti Serial
अलिबागची बालकलाकार आर्या मोरे 'सावित्रीजोती' मालिकेत साकारतेय 'ही' भूमिका

By

Published : Jan 13, 2020, 5:03 PM IST

Updated : Jan 13, 2020, 6:50 PM IST

रायगड- सोनी मराठी वाहिनीवर ६ जानेवारीपासून 'सावित्रीजोती- आभाळाएवढी माणसं होती' ही मालिका सुरू झाली आहे. या मालिकेद्वारे अलिबागची बालकलाकार आर्या गणेश मोरे ही पडद्यावर झळकली आहे. या मालिकेत ती सावित्रीबाईंची मैत्रीण 'गंगा'ची भूमिका साकारत आहे.

आर्या मोरे ही मूळची पेण मधली असून अलिबागमधील संभाजीवाडा हे तिचे आजोळ आहे. आर्या ही वडील गणेश मोरे आणि आई पूनम मोरे यांच्यासोबत चेंबूर येथे राहत आहे. चेंबूर येथील कर्नाटक हायस्कूलमध्ये ती इयत्ता पाचवीमध्ये शिकते. तिला अभियानासोबतच डान्सची आवड आहे.

अलिबागची बालकलाकार आर्या मोरे 'सावित्रीजोती' मालिकेत साकारतेय 'ही' भूमिका

मुंबईत झालेल्या 'पुलंच्या आठवणींची हास्यजत्रा' स्पर्धेत ७०० स्पर्धकांमधून ती दुसरी आली होती. त्यानंतर ७२ स्पर्धकांमध्ये झालेल्या स्पर्धेत टॉप पाच मध्ये तिची निवड झाली होती. या स्पर्धेच्या वेळी टेलिटेल मीडियाच्या वैशाली घोडपोडे, सोनीचे सिनियर प्रोड्युसर राजेश पाठक, तसेच काही दिगदर्शक, निर्माते उपस्थित होते. राजेश पाठक यांनी आर्याला अभिनय क्षेत्रात काम करणार का? विचारले होते. त्यानंतर आर्या हिची सोनी टीव्हीवर सुरू होणाऱ्या सावित्री जोतीसाठी निवड झाली.

हेही वाचा -'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत साजरी होणार शुभ्राची संक्रांत

'सावित्रीजोती' मालिकेत आर्या ही 'गंगा' नावाचे पात्र साकारत आहे. तिचा पहिलाच शॉट तिने पहिल्याच टेकमध्ये केला. याबाबत मालिकेतील सर्वांनी तिचे अभिनंदन केले. सावित्रीजोती मालिकेचे शुटींग हे नायगाव रत्नदीप स्टुडिओमध्ये सुरू असून सकाळी चार वाजता आर्या घरातून बाहेर पडते. शॉट पूर्ण झाल्यानंतरही ती अभिनय करण्यासाठी उत्सुक असते, अशी माहिती आर्यांची आई पूनम मोरे यांनी दिली.

आर्याने पुणे येथे झालेल्या हास्यजत्रा कार्यक्रमात विशाखा सुभेदार, समीर चौघुले, अतुल पुरचरे यांच्यासोबत काम केले आहे. झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको, स्टार प्रवाह वाहिनीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत रमाईच्या बहिणीची भूमिका, तर बाळूमामा या मालिकेतही बाल कलाकार म्हणून चमकली आहे. अभिनयासह ती भरतनाट्यम, पोक डान्स, वेस्टर्न डान्समध्ये चांगली कामगिरी करते. २०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नृत्याबद्दल सत्कार झाला आहे. तसेच ती जिम्नॅस्टिक्स सुद्धा करते.

हेही वाचा -'स्वामिनी' मालिकेत होणार अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची एन्ट्री

आर्याला अभिनेत्रीसोबतच डॉक्टरही बनायचे आहे. त्यामुळे शुटिंगनंतर मिळालेल्या वेळेत ती तिचा अभ्यास पूर्ण करते.

Last Updated : Jan 13, 2020, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details