मुंबई- करण जोहरच्या २०१२ साली आलेल्या 'स्टुडंट ऑफ द ईअर' चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातून आलिया भट्ट, वरूण धवन आणि सिद्धार्थ कपूर या तिघांनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'स्टुडंट ऑफ द ईअर २'मध्ये टायगरसोबत ठुमके लगावताना दिसणार आलिया - dance
सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून चित्रपटात आलिया एका गाण्यावर टायगरसोबत थिरकताना दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.
!['स्टुडंट ऑफ द ईअर २'मध्ये टायगरसोबत ठुमके लगावताना दिसणार आलिया](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2579512-1093-90e95ca0-8d22-4553-96ff-849f0348a9b9.jpg)
यात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असून चित्रपटात आलिया एका गाण्यावर टायगरसोबत थिरकताना दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सिनेमात टायगरशिवाय तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यादेखील मुख्य भूमिकेत झळकणार असून दोघीही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात टायगर आणि आलियाच्या या गाण्याच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. या निमित्ताने आलिया आणि टायगरची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने दोघांच्या चाहत्यांसाठी हे गाणं अधिक खास ठरणार, हे नक्की.