मुंबई -आलिया भट्ट पहिल्यांदाच ‘बाहुबली' चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्यासोबत काम करत आहे. 'आरआरआर' या चित्रपटात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य स्टार्सचा भरणा आहे. आलिया ‘सीता’ नावाचे पात्र साकारत आहे. तिच्या वाढदिवशी निर्मात्यांनी तिचा 'सीता' लूक समोर आणला आहे. या अगोदरच्या पोस्टरमध्ये आलियाच्या भोवताली एक शिखर दाखवण्यात आले होते जेणेकरून तिच्या लूकबद्दल उत्सुकता वाढेल.
आलिया भट्टचा ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘सीता’ लूक आला समोर - आलिया भट्ट आरआरआर चित्रपट न्यूज
एस.एस. राजामौलींच्या बहुचर्चित 'आरआरआर' या पॅन इंडिया चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टने काम केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती दक्षिण भारतातील चित्रपट जगतात पदार्पण करणार आहे. तिच्या पात्राचा फर्स्ट लूक समोर आला आहे.
मोशन पोस्टर लाँच असो, एखादे कॅरेक्टर पोस्टर असो, निर्मात्यांनी ‘आरआरआर’ चित्रपटाबद्दल नेहमीच उत्सुकता ताणत ठेवली आहे. या चित्रपटात अजय देवगण, आलिया भट्ट यांच्यासह राम चरण आणि ज्युनियर एनटीआर या कलाकारांच्या भूमिका आहेत. एस.एस. राजामौली हे या सिनेमाचे दिग्दर्शक असून हा बाहुबलीपेक्षाही मोठा चित्रपट असेल अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. ‘आरआरआर’ येत्या १३ ऑक्टोबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -ग्रॅमी अवॉर्ड्सच्या ६३ व्या पुरस्कार सोहळ्यात बियॉन्से ठरली सर्वाधिक मानांकित महिला कलाकार