मुंबई -अभिनेत्री आलिया भट्टची बहिण शाहिन हिचा आज ३१ वा वाढदिवस आहे. आपल्या बहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलियाने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
आलियाने हा फोटो शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'या फोटोवर एक चांगलं कॅप्शन देण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला. कॅप्शनसाठी मी टाईप करत गेली, कॅन्सल करत गेली. टाईप, कॅन्सल करता करता अखेर ही पोस्ट पूर्ण झाली आहे. मी एक चांगली लेखिका नाहीये. पण, आपण नेहमीच अर्थ नसणाऱ्या गप्पा करून त्यावर हसतो. आपलं नातं हे कोणत्याही भाषेवर अवलंबून नाही. फक्त आपल्या डोळ्यांच्या भाषेवरूनही आपण एकमेकींशी संवाद साधू शकतो', अशी पोस्ट लिहून आलियाने शाहिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा -B'Day Spl: यामीला बनायचं होतं आएएस अधिकारी, एका कॉलने बदललं आयुष्य