मुंबई - दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगुबाई काठीवाडी' चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरू होते. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
'गंगुबाई काठीवाडी' चित्रपटाच्या निमित्ताने आलिया भट्ट पहिल्यांदाच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी ती सलमान खानसोबत 'ईन्शाल्ला' चित्रपटात दिसणार होती. संजय लीला भन्साळीच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मात्र, काही कारणास्तव सलमानने या चित्रपटातून माघार घेतली. त्यामुळे आलिया भट्ट आता त्यांच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा -'मुंह दिखाई २.०' मधून दीपिकाने उलगडला 'छपाक'चा प्रवास