महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गंगुबाई काठीवाडी'चं मोशन पोस्टर, आलियाने शेअर केला व्हिडिओ - आलिया भट्ट चित्रपट

आलिया भट्टने हे मोशन पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे.

Alia Bhatt share Motion poster of Gangubai Kathiawadi film
'गंगुबाई काठीवाडी'चं मोशन पोस्टर, आलियाने शेअर केला व्हिडिओ

By

Published : Jan 14, 2020, 4:16 PM IST

मुंबई -दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगुबाई काठीवाडी' चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. बऱ्याच दिवसापासून या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरू होते. आता या चित्रपटाचे मोशन पोस्टरही प्रदर्शित झाले आहे.

आलिया भट्टने हे मोशन पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे. 'गंगुबाई काठीवाडी' चित्रपटाच्या निमित्ताने आलिया भट्ट पहिल्यांदाच संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे.

यापूर्वी ती सलमान खानसोबत 'ईन्शाल्ला' चित्रपटात दिसणार होती. संजय लीला भन्साळीच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मात्र, काही कारणास्तव सलमानने या चित्रपटातून माघार घेतली.

हेही वाचा -अभिनेत्री अनुष्का शेट्टी शिर्डीत साई चरणी लीन

आता आलिया भट्ट आता त्यांच्या 'गंगुबाई काठीवाडी'मध्ये भूमिका साकारणार आहे.

हा चित्रपट पुढच्या वर्षी ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. गंगुबाई काठीवाडी हा एक बायोग्राफिकल चित्रपट आहे. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्विन ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट राहणार आहे.

हेही वाचा -सोनाक्षी सिन्हाचा अ‌ॅक्शन अवतार, शेअर केला थ्रोब‌ॅक व्हिडिओ

संजय लीला भन्साळींनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तसेच, त्यांच्या निर्मितीखाली आणि दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार आहे. दीपिका पदुकोण, रणबीर कपूर यांचीही यामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका राहणार असल्याचं बोललं जात आहे. तर, विजय राज आणि विनय पाठक यांचीही काही अशंत: भूमिका पाहायला मिळेल.

हेही वाचा -मीत ब्रोझच्या नव्या गाण्यात उर्वशी रौतेलाचा देसी अवतार

ABOUT THE AUTHOR

...view details