महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'नजर ना लगे', रणबीरसोबतच्या नात्याबाबत आलिया म्हणते... - Releationship

आलिया आणि रणबीरने जरी त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली, तरीही दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियामध्ये उधाण येते. दोघेही अनेकदा सोबत वेळ घालवताना दिसतात.

'नजर ना लगे', रणबीरसोबतच्या नात्याबाबत आलिया म्हणते...

By

Published : Jun 23, 2019, 12:52 PM IST

मुंबई -बॉलिवूडचे लव्हबर्ड्स म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या रिलेशनशीपबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. आलिया आणि रणबीरने जरी त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली, तरीही दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सोशल मीडियामध्ये उधाण येते. दोघेही अनेकदा सोबत वेळ घालवताना दिसतात. त्यामुळे हे लव्हबर्ड्स माध्यमांच्या प्रसिद्धीझोतात येते. अलिकडेच आलियाने रणबीरसोबतच्या नात्याबाबत एक खुलासा केला आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, आलियाने तिचे आणि रणबीरचे नाते नेमके कशाप्रकारचे आहे, यावर संवाद साधला. तिने सांगितले, 'मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगते की खरंतर हे नातं मैत्रीचं आहे. खूप सुंदर अशी आमची मैत्री आहे. सध्या मला तारे आणि ढगांच्यामधुन प्रवास करण्याचा भास होतोय. आमच्या दोघांचेही स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. तो देखील नियमीत शूटिंग करत असतो. मी देखील नियमीत शूटिंगमध्ये व्यस्त असते. मात्र, आता सोबतच चित्रपटात भूमिका साकारत असल्यामुळे आम्ही सतत एकमेकांसोबत दिसतो. त्याच्यासोबतच नातं हे अगदी कंम्फर्टेबल आहे. नजर ना लगे', असे ती या मुलाखतीत म्हणाली.

आलियाने पुढे असेही सांगितले की 'रणबीर तिला नेहमी तणावरहीत आयुष्य जगण्याचा सल्ला देत असतो. माझ्या हातात ज्या गोष्टींचं नियंत्रण राहत नाही, त्या गोष्टींचा मला प्रचंड तणाव येतो. मात्र, रणबीर मला नेहमी या तणावातून बाहेर काढतो'.

आलिया आणि रणबीर लवकरच 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांचीही भूमिका आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details