मुंबई -बॉलिवूडचं लव्हबर्डस आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यातील प्रेम दिवसेंदिवस बहरताना दिसत आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेक कार्यक्रमातही दोघे एकमेकांसोबत दिसतात. आलिया आणि रणबीर जरी जाहिरपणे त्यांच्या नात्याविषयी बोलत नसले, तरीही त्यांच्या कृतीतून त्यांचे प्रेम लगेचच सर्वांना दिसते. अशाच एका व्हिडिओतूनही आलिया भट्टचे रणबीरवरील प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे.
VIDEO: ..अन् वरुण ऐवजी आलियाच्या तोंडातून निघाले रणबीरचेच नाव - ranbir kapoor
एका शोमध्ये 'कलंक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'कलंक'च्या संपूर्ण स्टारकास्टने हजेरी लावली होती. यादरम्याने वरुण धवन आलियाच्या केसांसोबत खोड्या काढत होता. आलिया वरुणला याबद्दल बोलणार तोच तिच्या तोंडुन त्याच्या नावाऐवजी रणबीरचे नाव निघाले.
वरुण ऐवजी आलियाच्या तोंडातून निघाले रणबीरचेच नाव
एका शोमध्ये 'कलंक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'कलंक'च्या संपूर्ण स्टारकास्टने हजेरी लावली होती. यादरम्याने वरुण धवन आलियाच्या केसांसोबत खोड्या काढत होता. आलिया वरुणला याबद्दल बोलणार तोच तिच्या तोंडुन त्याच्या नावाऐवजी रणबीरचे नाव निघाले. मात्र, लगेचच आलियाने स्वत:ला सावरले. मात्र, तिच्या या गमतीदार चुकीवर सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि वरुण धवन खळखळून हसले. तर, आलियाचा चेहरादेखील लाजेने लाला झाला होता.
आलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.