मुंबई - आपल्या क्युट अदांनी चाहत्यांना नेहमीच भूरळ घालणारी आलिया भट्ट आता नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने अलिकडेच तिचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. यावर ती चाहत्यांना फिटनेस आणि मेकअप आदीचे धडे देताना दिसणार आहे. तिच्या यूट्यूब चॅनेलवर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पिवळ्या साडीत 'टीप टीप बरसा' गाण्यावर डान्स करतानादेखील दिसत आहे.
आलिया भेटणार 'या' माध्यमातून, फिटनेस,मेकअपसह सांगणार फिल्म्स-लाईफबद्दल - ranbir kapoor
आलिया नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटांचे अपडेट्स, नविन फोटो ती चाहत्यांशी शेअर करत असते.
आलियाने हे चॅनेल सुरू करताच चाहत्यांनी हे चॅनेल सबस्क्राईबदेखील करायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत लाखो चाहत्यांनी तिचा हा व्हिडिओ पाहिला आहे. आलिया नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या चित्रपटांचे अपडेट्स, नविन फोटो ती चाहत्यांशी शेअर करत असते. इन्स्टाग्रामवदेखील तिचे लाखो फॅन फॉलोअर्स आहेत. आता यूट्यूबच्या माध्यमातूनही ती व्हिडिओद्वारे चाहत्यांना धडे देताना दिसणार आहे.
आलियाच्या चित्रपटांबाबत बोलायचे झाले तर, लवकरच ती रणबीर कपूरसोबत 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात झळकणार आहे. त्यानंतर ती 'सडक २' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानसोबतहीती पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे. 'ईन्शाल्ला' चित्रपटात तिची आणि सलमानची जोडी पाहायला मिळणार आहे.