महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है'च्या रिमेकमध्ये झळकणार नंदिता दास आणि मानव कौल - Nandita Das

'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है'च्या ऑफिशियल रिमेकमध्ये नंदिता दास आणि मानव कौल झळकणार आहेत...१९८०मध्ये बनलेला हा हिंदी क्लासिक सिनेमा होता...१२ एप्रिल रोजी हा सिनेमा रिलीज होईल...

अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है

By

Published : Mar 6, 2019, 9:49 PM IST


मुंबई - मंटोची दिग्दर्शिका नंदिता दास, अभिनेता मानव कौल आणि सौरभ शुक्ला हे आगामी 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है'च्या ऑफिशियल रिमेकमध्ये झळकणार आहेत. तरण आदर्श यांनी या बातमीला दुजोरा देत पोस्टर शेअर केले आहे.

१९८० मध्ये आलेल्या 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है' या क्लासिक चित्रपटात नसिरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि स्मीता पाटील यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचा रिमेक दिग्द्रशक सौमित्र रानडे करणार आहेत. सौमित्र हे 'जजंत्रम ममंत्रम' आणि 'अलिबाबा और चालीस चोर' या चित्रपटासाठी ओळखले जातात. तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है' हा चित्रपट १२ एप्रिल रोजी रिलीज होईल.

अल्बर्ट पिंटो या तरुण मेकॅनिकची ही गोष्ट आहे. तो संपावर जाणाऱ्या सहकाऱ्यांवर भडकत असतो. कामगारांचे मालक शोषण करीत असतात याचा त्याला नंतर प्रत्यय येतो. हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानले जाणाऱ्या काही चित्रपटांमध्ये 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है' चित्रपटाचा समावेश होतो.

ABOUT THE AUTHOR

...view details