मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्टअवेटेड सिनेमा 'बच्चन पांडे' हा 26 जानेवरी 2022 म्हणजे प्रजास्ताक दिनी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भात अक्षय कुमारने टि्वटरवरून माहिती दिली आहे. 53 वर्षीय अक्षय कुमार या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित केला असून साजिद नाडियाडवालाने चित्रपटाची निर्मिती केली आहे.
'बच्चन पांडे' चित्रपट 26 जानेवरी 2022 ला प्रदर्शित होणार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्टअवेटेड सिनेमा 'बच्चन पांडे' हा 26 जानेवरी 2022 म्हणजे प्रजास्ताक दिनी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 53 वर्षीय अक्षय कुमार या चित्रपटामध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये पाहायला मिळणार आहे.
अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे'मध्ये हटके लूक असून या लूकमध्ये अक्षय कुमार गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या नावावरुनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटामध्ये अॅक्शनचा भरणा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तर अक्षय आणि कृती सेनॉन पुन्हा एकत्र दिसतील. हाऊसफुल 4 मध्ये कृतीने अक्षयची कोस्टार म्हणून काम केले होते. बच्चन पांडेमध्ये कृती एका पत्रकाराच्या भूमिकेत असणार आहे. तसेच चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी आणि अर्षद वारसी यांचीही भूमिका असणार आहे.
साजिद नाडियाडवाला यांच्यासोबतचा अक्षयचा हा 10 वा चित्रपट आहे. जैसलमेरमध्ये या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. तसेच अक्षयने 'अतरंगी रे' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. अक्षयसोबत या सिनेमात सारा अली खान आणि धनुष दिसणार आहेत. तर लक्ष्मी बॉम्ब चित्रपट 9 नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर रिलीज झाला होता. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. हॉरर कॉमेडी प्रकारात मोडणारा हा चित्रपट होता. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथी व्यक्तीची भूमिका साकारताना दिसला होता.