महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'तुला मार्ग दाखवायला मी नेहमी तुझ्यासोबत असेल', अक्षयने मुलाला 'अशा' दिल्या शुभेच्छा! - akshay kumar son aarav

अक्षय कुमारचा मुलगा आरव आज १७ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अक्षय आणि ट्विंकल खन्ना दोघांनीही आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

'तुला मार्ग दाखवायला मी नेहमी तुझ्यासोबत असेल', अक्षयने मुलाला 'अशा' दिल्या शुभेच्छा!

By

Published : Sep 15, 2019, 7:00 PM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरव आज १७ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अक्षय आणि ट्विंकल खन्ना दोघांनीही आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारने आरवचा एक फोटो शेअर करुन त्याच्यासाठी खास संदेशही लिहिला आहे.

अक्षयने या पोस्टमध्ये लिहलंय, 'माझ्या वडिलांकडून मी एक गोष्ट शिकलो. जेव्हाही मी कोणती चुक करत असे, तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की ते मला माफ करतील. ते मला शिक्षा देतील, असं कधीच वाटलं नाही. आज तुला पाहून मलादेखील असंच वाटतं की मी योग्य करत आहे. मी तुला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तुझ्यासोबत असेल', असं लिहून त्याने आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा-Engineer's Day: बॉलिवूडचे 'हे' कलाकार आहेत इंजिनिअर्स, अभिनयातही पटकावलं अव्वल स्थान

दुसरीकडे ट्विंकल खन्नानेही आरवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारने एका माध्यमाच्या मुलाखतीत आरवबद्दल सांगितलं होतं. की 'स्टारकीड असल्यामुळे त्यालाही तणाव असतो. कधी कधी सोशल मीडियावर स्टारकीड्सला ट्रोलिंगलाही सामोरे जावं लागतं. त्यामुळे आरव लाईमलाईटपासून दुर राहतो. सध्या तो त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्याला पुढील शिक्षणासाठी लंडन येथे जायचे आहे. त्यामुळे त्याने त्याची तयारी देखील केली आहे'.

हेही वाचा-'वॉर' चित्रपटात टायगरने एकाच शॉटमध्ये साकारला अडीच मिनिटांचा अॅक्शन सिन, दिग्दर्शकाचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details