मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची 'सिंम्बा' चित्रपटातच घोषणा करण्यात आली होती. 'सिम्बा' चित्रपटात अक्षय कुमारची एन्ट्री ही चाहत्यांसाठीही सरप्राईझ पॅकेज होते. रोहित शेट्टीने हे खास सरप्राईझ चाहत्यांना दिले होते. अक्षय कुमार पहिल्यांदाच रोहित शेट्टीसोबत काम करत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित - simmba
अक्षय कुमार पहिल्यांदाच रोहित शेट्टीसोबत काम करत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
सूर्यवंशी
अक्षय कुमार 'सूर्यवंशी' या चित्रपटात एसटीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी त्याने बऱ्याचवेळा पोलिसाची भूमिका साकारली आहे. मात्र, 'रावडी राठोड' चित्रपटापासून त्याच्या पोलिसाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे.