मुंबई -बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक बिग बजेट चित्रपटांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही तगडी शर्यत पाहायला मिळते. यंदाची सुरुवातही 'छपाक' आणि 'तान्हाजी द अनसंग वॉरिअर' या दोन चित्रपटांच्या शर्यतीने झाली. यामध्ये 'तान्हाजी' चित्रपटाने बाजी मारली. येणाऱ्या काळातही बऱ्याच चित्रपटांची चुरस पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार आणि दीपिका पदुकोण यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा सोशल मीडियावर जाहीर केल्या आहेत.
दीपिका पदुकोणने यंदा 'छपाक' चित्रपटाने वर्षाची सुरुवात केली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, अजय देवगणच्या 'तान्हाजी' चित्रपटासमोर 'छपाक'ची गती मंदावली होती. आता दीपिकाने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 'इंटर्न' असे या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये ती ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
ऋषी कपूर यांनीही या चित्रपटाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.