मुंबई -बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा या वर्षातील शेवटचा चित्रपट 'गुड न्यूज' २७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. यंदाचं वर्ष हे अक्षय कुमारसाठी यशस्वी ठरलं. यावर्षी त्याचे 'केसरी', 'मिशन मंगल' आणि 'हाऊसफुल ४' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. आता वर्षाअखेरीस 'गुड न्यूज' घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'गुड न्यूज' चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच यातील गाणीदेखील चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर हिट ठरली आहेत. यातले 'सौदा खरा खरा' या गाण्याची सध्या क्रेझ पाहायला मिळतेय. विशेषत: अक्षयने यामध्ये केलेला नागीन डान्स तर तुफान हिट झाला आहे. या गाण्याचे शूटिंग करताना नेमकी काय धमाल झाली, त्याचा मेकिंग व्हिडिओ अक्षयने ट्विटरवर शेअर केला आहे.
हेही वाचा -'हाऊसफूल ४' नंतर अक्षय कुमारची पुन्हा 'गुड न्यूज', पाहा धमाल ट्रेलर