मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची जोडी लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. ट्विंकल खन्ना आता बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी ती एक लेखिका म्हणून चाहत्यांच्या भेटीला येत असते. आत्तापर्यंत तिचे बरेच पुस्तकं प्रकाशीत झाले आहेत. अक्षय कुमारही तिच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजर असतो. मात्र, गंमत म्हणजे त्याने अजुनही तिचे एकही पुस्तक वाचलेले नाही. याचा खुलासाही त्याने स्वत:च केला आहे.
अक्षयने ट्विंकल आणि सुप्रसिद्ध लेखक जेफरी आर्चर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवर त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, की 'ट्विंकलचे पुस्तक पैजामा आर फॉरगिव्हिंग' खूप लोकप्रिय झाले आहे. आत्तापर्यंत या पुस्तकाच्या १० लाखापेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत. तसेच, जेफरी आर्चर यांची 'केन अँड ऐबल' ही कांदबरी देखील लोकप्रिय झाली आहे'.