मुंबई -बऱ्याचदा मुंबईत पावसामुळे लोकलचा वेग मंदावतो. जनजीवनही विस्कळीत होते. मात्र, मेट्रोवर पावसाचा किंवा ट्रॅफिकचा जास्त परिणाम होत नाही. यामुळे वेळही वाचतो. म्हणूनच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही मेट्रोने प्रवास केला. त्याचा घाटकोपर ते वर्सोवादरम्यानचा २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटात पूर्ण झाला. त्यामुळे त्याने आपला अनुभव चाहत्यांशी शेअर केला आहे.
अक्षयने एक व्हिडिओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने त्याच्या मेट्रोचा अनुभव सांगितला. 'ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी एखाद्या बॉसप्रमाणे घाटकोपर ते वर्सोवापर्यंत मेट्रोने प्रवास केला', असं कॅप्शन त्याने या व्हिडिओवर दिलं आहे.
हेही वाचा -संजय लीला भन्साळींच्या 'ईन्शाल्ला'मधून भाईजानची माघार