मुंबई -अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचं आयकॉनिक आणि ग्लॅमरस असलेलं 'टीप टीप बरसा पाणी' या गाण्याचं रिक्रियेटेड व्हर्जन पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटात कॅटरिना कैफ आणि अक्षयवर हे गाणं चित्रीत होणार आहे. ९० च्या दशकात 'मोहरा' चित्रपटात रविना आणि अक्षयवर हे गाणं शूट झालं होतं. आता २५ वर्षानंतर पुन्हा एकदा हे गाणे चाहत्यांना पाहता येणार आहे.
अक्षय कुमारनेच याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. मध्यंतरी 'टीप टीप बरसा पाणी' गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन 'सूर्यवंशी'मध्ये पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता अक्षयनेच याबाबत माहिती शेअर केली आहे.