महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पुढच्या वर्षी अक्षय कुमार गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित - बच्चन पांडे

पुढच्या वर्षीच्या १५ ऑगस्टला देखील त्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाला तर नवल वाटायला नको, कारण, आजकाल फक्त अक्षयच्याच चित्रपटांची हवा बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतेय.

पुढच्या वर्षी अक्षय कुमार गाजवणार बॉक्स ऑफिस, 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित

By

Published : Sep 9, 2019, 12:20 PM IST

मुंबई -बॉलिवूडची 'हिट मशीन' म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमारचे बॅक टू बॅक हिट चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. यावर्षी त्याच्या 'केसरी' आणि 'मिशन 'मंगल' चित्रपटाने १०० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. याशिवाय त्याचा 'सूर्यवंशी', 'गुड न्यूज' हे चित्रपट याचवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पुढच्या वर्षी देखील बॉक्स ऑफिसवर अक्षयचंच राज्य असेल, असे चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण, पुढच्या वर्षी देखील अक्षयचे ३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

अक्षय कुमारचे पुढच्या वर्षी ईदच्या पर्वावर 'लक्ष्मी बाँब' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच, दिवाळीच्या मुहूर्तावर 'पृथ्वीराज', तर, क्रिसमसच्या दिवशी 'बच्चन पांडे' हे चित्रपट रिलीज होणार आहेत. पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला देखील त्याचा एखादा चित्रपट प्रदर्शित झाला तर नवल वाटायला नको, कारण, आजकाल फक्त अक्षयच्याच चित्रपटांची हवा बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतेय.

हेही वाचा -यशराज फिल्म्ससोबत एकत्र येणार अक्षय कुमार, 'पृथ्वीराज'चा टीझर प्रदर्शित

अक्षयच्या वाढदिवशीच 'पृथ्वीराज' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात राजा पृथ्वीराज चौहाण यांची महागाथा पाहायला मिळेल.

ट्विटरवर ट्रेण्ड होतोय बर्थडे हॅशटॅग -
आज अक्षय कुमारचा ५२ वा वाढदिवस असल्यामुळे त्याच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवर #HappyBirthdayAkshayKumar हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. हा हॅशटॅग वापरुन चाहते अक्षयला शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा-Bday Spl: अक्षय कुमारचा 'खिलाडी' ते 'हिट मशीन' पर्यंतचा 'फिल्मी' प्रवास...!

ABOUT THE AUTHOR

...view details