महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Man Vs Wild मध्ये रजनीकांत पाठोपाठ अक्षय कुमारचीही एन्ट्री - Man Vs Wild upcoming episode

या कार्यक्रमाच्या आगामी भागात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची जंगल सफारी पाहायला मिळणार आहे. त्यांनी या भागांचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. आता त्यांच्यापाठोपाठ बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही या कार्यक्रमात दिसणार आहे.

Akshay Kumar at Mysore to shoot for 'Man vs Wild' Bear Grylls
Man Vs Wild मध्ये रजनीकांत पाठोपाठ अक्षय कुमारचीही एन्ट्री

By

Published : Jan 30, 2020, 9:57 AM IST

मुंबई -डिस्कव्हरी वाहिनीवरील बेयर ग्रिल्सचा Man Vs Wild हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची जंगल सफारी पाहायला मिळणार आहे. त्यांनी या भागांचे चित्रीकरणही पूर्ण केले आहे. आता त्यांच्यापाठोपाठ बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील या कार्यक्रमात दिसणार आहे. कर्नाटकमधील म्हैसूर येथे तो शूटिंगसाठी रवाना झाला आहे.

अक्षय कुमार नेहमीच त्याच्या साहसी स्टंट साठी ओळखला जातो. बॉलिवूडचा फिटेस्ट मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच Man Vs Wild या कार्यक्रमात त्याला पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरणार आहे. बेयर ग्रिल्ससोबत त्याची जंगलातील सफर कशी राहणार, हे आता आगामी भागातच पाहायला मिळेल.

हेही वाचा -'लव्ह आज कल २' चं नवं गाणं, पाहा सारा-कार्तिकचा धमाल डान्स

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अक्षय कुमार यावर्षी 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बाँब', 'पृथ्वीराज' यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबतच पुढच्या वर्षीच्या चित्रपटांचीही तारीख त्याने जाहीर केली आहे. यामध्ये 'बेलबॉटम' आणि 'बच्चन पांडे' यांसारख्या चित्रपटाचा समावेश आहे.

याशिवाय त्याचा गाजलेला म्युझिक व्हिडिओ 'फिलहाल' या गाण्याचा दुसरा भागही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे दुसरे पोस्टर त्याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केले आहे.

हेही वाचा -बेयर ग्रीलसोबत 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मध्ये दिसणार रजनीकांत

ABOUT THE AUTHOR

...view details