मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांचा 'केसरी' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. अक्षय आणि परिणीती दोघेही सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अलिकडेच त्यांनी दिल्ली येथे हजेरी लावली होती. येथे त्यांनी बीएसएफ जवानांची भेट घेतली.
यादरम्यान अक्षय कुमार आणि परिणीतीने जवानांसोबत डान्सही केला. 'केसरी' चित्रपटाच्या गाण्यावरच जवानांसोबत दोघांनीही ठेका धरला होता. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अक्षय कुमारनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.