महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'भूतराजा' बनून नवाजुद्दीनने केले अक्षयला बेहाल, पाहा 'हाऊसफुल ४'चं धमाल गाणं - housefull 4 release date

मिका सिंगने हे गाणं गायलं आहे. सध्या यूट्यूबवर हे गाणं ट्रेण्डींगमध्ये आहे. अक्षय कुमारनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे.

'भूतराजा' बनून नवाजुद्दीनने केले अक्षयला बेहाल, पाहा 'हाऊसफुल ४'चं धमाल गाणं

By

Published : Oct 17, 2019, 8:04 AM IST

मुंबई -बॉलिवूडमध्ये कॉमेडी चित्रपटांमध्ये 'हाऊसफुल'च्या सीरिजने आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. लवकरच 'हाऊसफुल ४' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणी आत्तापर्यंत रिलीज करण्यात आली आहे. यापैकी 'बाला' गाण्याची सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळते. आता या चित्रपटातील आणखी एक धमाल गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

अलिकडेच 'हाऊसफुल ४'मधील 'भूत राजा' हे गाणं रिलीज झालं आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या गाण्यात मांत्रिकाच्या भूमिकेत दिसला आहे. 'भूत राजा' बनुन तो अक्षय कुमारच्या अंगातील भूत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. गाण्यात तो त्याचा लोकप्रिय 'कभी कभी लगता है अपूनहीच भगवान है' हा डॉयलॉगही बोलताना दिसतो.

हेही वाचा -'हॉस्टेजेस' बेवसिरीजचा दुसरा सिझन बनणार भारतात

मिका सिंगने हे गाणं गायलं आहे. सध्या यूट्यूबवर हे गाणं ट्रेण्डींगमध्ये आहे. अक्षय कुमारनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे.

'हाऊसफुल ४'मध्ये पुनर्जन्माची कथा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, पूजा हेगडे, क्रिती सेनॉन, क्रिती खारबंदा यांची मुख्य भूमिका आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.

हेही वाचा -'हाउसफुल 4 एक्सप्रेस'मधून प्रवास करतानाचा अक्षय, रितेशचा धमाल व्हिडिओ


२६ ऑक्टोंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details