सध्या सगळीकडे ‘एवेन्जर्स एन्ड गेम’ आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे वारे वाहत आहेत. चाहते गेम ऑफ थ्रोन्सच्या प्रत्येक भागाची अगदी उत्सुकतेने वाट पाहत असतात. 'गेम ऑफ थ्रोन्स'ची अजून एक मोठी चाहती म्हणजे तुझ्यात जीव रंगला मालिकेमधील पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर. तिचा जीव सध्या रंगलाय तो 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये.
पाठक बाईंचा जीव 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये रंगला - Pathak Bai
अभिनेत्री अक्षय देवधर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची चाहती आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील ही अभिनेत्री या मालिकेत रंगल्याची सध्या चर्चा आहे.
![पाठक बाईंचा जीव 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये रंगला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3153078-132-3153078-1556635829537.jpg)
चित्रीकरणातून थोडा वेळ काढत अक्षया सध्या त्याचे एपिसोड्स पाहतेय. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिनं नुकतीच याबद्दलची एक पोस्ट केली होती. प्रत्येक आठवड्यात आता पाठक बाई 'गेम ऑफ थ्रोन्स'चा नवीन भाग पाहण्यासाठी नियमितपणे वेळ काढतील हे मात्र नक्की.
गेम ऑफ थ्रोन्सच याड फक्त पाठक बाईनच नाही तर संपूर्ण जगाला लागलंय. जगातील या पॉप्युलर या अमेरिकन सिरीजचे जगभरात करोडो चाहते आहेत. विंटरफेल राज्यात घडणाऱ्या सत्तासंघर्षात लोखंडी सिंहासनावर विराजमान होण्यासाठी आठ वेगवेगळी साम्राज्य आपापसात झुंजतायत. तुझ्यात जीव रंगलामध्ये एक नंदिनी वहिनी, राणा आणि पाठक बाईंचं जगणं अवघड करतात. तिथे विंटरफेलमध्ये आशा अनेक नंदिता आणि असंख्य अडचणींचा सामना कथेतल्या पात्रांना करावा लागतो. अशात पाठक बाईंना त्यात नक्की काय घडत हे जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली तर त्यात वावग ते काय..आपण राणा दाच्या स्टाईलमध्ये एवढंच म्हणूयात 'चालतय की'.