महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'Ajinkya' movie : देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित ‘अजिंक्य’ चित्रपटाला IMDbवर १० पैकी १० रेटिंग्ज! - अजिंक्य चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा

१९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांच्यावर चित्रीत अजिंक्य ( 'Ajinkya' movie )या चित्रपटाचे सोशल मीडिया आणि चित्रपट समीक्षकांकडून कौतुक होताना दिसत आहे. पी शर्मा यांनी अजिंक्य या चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यावर तोडगा काढणारा तरुण याची कथा दर्शविण्यात आल्याकारणाने त्यांनी हा चित्रपट संपूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत असे म्हटले आहे.

मराठी चित्रपट अजिंक्य
मराठी चित्रपट अजिंक्य

By

Published : Nov 23, 2021, 7:46 PM IST

Updated : Nov 23, 2021, 8:34 PM IST

महाराष्ट्रातील चित्रपटगृहांचे टाळे उघडले आणि हिंदीबरोबरच मराठी चित्रपटही सिनेमागृहांत प्रदर्शित होऊ लागले आणि त्यातिलक एक म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला ‘अजिंक्य’ ( 'Ajinkya' movie ). दिनांक १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे चित्रीत अजिंक्य या चित्रपटाचे सोशल मीडिया आणि चित्रपट समीक्षकांकडून कौतुक होताना दिसत आहे. अमराठी निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे, आणि वेद. पी शर्मा यांनी अजिंक्य या चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यावर तोडगा काढणारा तरुण याची कथा दर्शविण्यात आल्याकारणाने त्यांनी हा चित्रपट संपूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत असे म्हटले आहे. शेतकरी चळवळीसाठी समर्पित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरू शकेल.

याबद्दल निर्माते नीरज आनंद सांगतात, "चित्रपट हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून यातून जनतेचे प्रबोधन व्हावे आणि याच उद्देशाने भारताच्या विविध ठिकाणाहून आलेले आम्ही एकत्र येऊन एका सिनेमासाठी काम करत आहोत. लावलेल्या पैश्याच्या परतफेडीचा विचार न करता एक ज्वलंत विषय लोकांसमोर आणणे आम्हाला महत्वाचे वाटते. हा चित्रपट देशाला जगवणारे अन्नदाते म्हणजेच आपले शेतकरी बंधू यांना समर्पित करण्याची आमची ईच्छा आहे."

शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याच्या सर्वात मोठ्या बाबींवर भाष्य करणाऱ्या अजिंक्यची आणि सध्या देशात या विषयी सुरू असणाऱ्या घडामोडी याच कारणामुळे सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आयएमडीबी (IMDb) वर सदर चित्रपटाला १० पैकी १० रेटिंग्ज मिळाले आहेत. कालपासून ट्विटरवर देखील मोदी इज अजिंक्य टुडे (#ModiisAjinkyatoday) हा हॅशटॅग ट्रेंड होत असून लोकांमार्फत अजिंक्य या चित्रपटाबद्दल खूप बोललं जात आहे. चित्रपटाचे मुख्य कलाकार म्हणजेच अजिंक्य आणि रितिका च्या भूमिकेत असलेले अनुक्रमे भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे यांनादेखील याच संकल्पनेमुळे चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली असे ते सांगतात.

देशाच्या शेतकऱ्यांना समर्पित असणारा चित्रपट ‘अजिंक्य’ ला IMDbवर १० पैकी १० रेटिंग्ज मिळाले असून प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडतोय हे चित्रपटगृहांत होणाऱ्या गर्दीवरून समजते.

हेही वाचा - Vijeta Re Released : सुभाष घई यांचा मराठी चित्रपट ‘विजेता’ पुनःप्रदर्शनासाठी सज्ज!

Last Updated : Nov 23, 2021, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details