मुंबई -फुटबॉल खेळाचा रंजक सुवर्णकाळ उलगडणारा 'मैदान' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अजय देवगन यामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. आता नवं पोस्टर प्रदर्शित करुन चित्रपटाच्या नव्या तारखेबाबत माहिती देण्यात आली आहे.
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. हा चित्रपट आता ११ डिसेंबर २०२० ला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अजय देवगन फुटबॉल परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.