मुंबई -अजय देवगनच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता दुसरा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्येही तान्हाजींच्या शौर्यगाथेची झलक पाहायला मिळते. महाराजांच्या स्वराज्यावर शत्रूंचा डोळा असतानाही कशा प्रकारे वीर मावळ्यांनी मोठ्या धीराने आणि साहसाने आपल्या जीवाची बाजी लावली, याची साहसकथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
तान्हाजी मालुसरे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोंढाणा किल्ल्यासाठी लढाई केली होती. घरात आपल्या मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना कोंढाणा राखण्यासाठी ते सज्ज झाले होते. 'आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं', असं म्हणून त्यांनी या लढाईसाठी आपल्या प्राणाजी बाजी लावली.
हेही वाचा -प्रतीक्षा संपली.. रजनीकांत यांच्या 'दरबार'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित