मुंबई -बॉलिवूडमध्ये आजवर ऐतिहासिक चित्रपटांना विशेष पसंती मिळाली आहे. त्यामुळेच आत्तापर्यंत बरेचसे ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक समोर आल्यानंतर आता या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे', असे म्हणून त्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावून कोंढाणा गड राखला. त्यांच्या शौर्याची हीच गाथा तान्हाजी चित्रपटात उलगडणार आहे.
हेही वाचा -'तान्हाजी'च्या निमित्ताने अजयच्या चित्रपटाचं शतक, पाहा खास व्हिडिओ