मुंबई -बाहुबली सिरीजला मिळालेल्या भरघोस यशानंतर राजामौलींच्या आगामी सिनेमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता आरआरआर (RRR) या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘आरआरआर’ची घोषणा झाल्यापासूनचं या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाली. दक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. आता अभिनेता अजय देवगनची देखील या चित्रपटात एन्ट्री झाली आहे.
अजय देवगन सध्या त्याच्या 'तान्हाजी - द अनसंग वॉरिअर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटी पार करण्याची शक्यता आहे. आता त्याने ‘आरआरआर’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
हेही वाचा -अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित