अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटाची तारीख जाहीर, या दिवशी होणार प्रदर्शित - ajay devgan upcomming films
अजय देवगनसोबतच अभिनेत्री क्रिती सुरेशदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अजय देवगनच्या 'मैदान' चित्रपटाची तारीख जाहीर, या दिवशी होणार प्रदर्शित
मुंबई -बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनचा 'मैदान' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट फुलबॉलवर आधारित आहे. काही महिन्यांपूर्वी अजयने या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
हा चित्रपट पुढच्या वर्षी 27 नोव्हेंबरला सिनेमागृहात झळकणार आहे. अजय देवगनसोबतच अभिनेत्री क्रिती सुरेशदेखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.