मुंबई -कॉमेडी आणि आपल्या धमाल अंदाजांने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'गोलमाल' चित्रपटाचा पाचवा भाग लवकरच तयार करण्यात येणार आहे. रोहित शेट्टीच्या 'सिंबा' चित्रपटातच या चित्रपटाचा संकेत मिळाला होता. त्यामुळे 'गोलमाल ५' तयार होणार हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. पुढच्या वर्षीपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना आतुरता आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाची कथा ही नविन आणि उत्कंठा वाढवणारी असेल. पुढच्या वर्षा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. या चित्रपटात अजय देवगनसोबतच गोलमालच्या इतर स्टारकास्टची पुन्हा धमाल पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -'मिनी मुव्ही मँनिया'मध्ये गोवा विभागात 'राँग' तर राष्ट्रीय विभागात 'अडगळ' ठरले विजेते