महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऐश्वर्या आणि कटप्पाची जमणार जोडी, 'या' चित्रपटात दिसणार एकत्र - ponnini selvam

सत्यराज यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 'बाहुबली'च्या दोन्हीही भागात त्यांनी साकारलेली 'कटप्पा'ची भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली.

ऐश्वर्या आणि कटप्पाची जमणार जोडी, 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

By

Published : Apr 19, 2019, 1:25 PM IST

मुंबई - 'बाहुबली' चित्रपटातून 'कटप्पा' म्हणून लोकप्रिय झालेले अभिनेते सत्यराज आणि बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन दोघेही लवकरच एकत्र झळकणार आहेत. दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी बिग बजेट चित्रपटासाठी दोघांचीही वर्णी लागली आहे. 'पोन्निनी सेल्वम' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.

सत्यराज यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 'बाहुबली'च्या दोन्हीही भागात त्यांनी साकारलेली 'कटप्पा'ची भूमिका चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस पडली. 'पोन्निनी सेल्वम' या चित्रपटात ऐश्वर्या राय त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

'मणिरत्नम' यांचा हा बिग बजेट चित्रपट आहे. एका तमिळ गोष्टीवर या चित्रपटाचे कथानक आधारित आहे. ऐश्वर्या या चित्रपटात राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'मणिरत्नम' यांनी अमिताभ बच्चन यांना देखील या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी विचारणा केली आहे. यावर त्यांचे अद्याप काही उत्तर समोर आले नाही. त्यामुळे जर बिग बींनी या चित्रपटासाठी होकार दिला तर, पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details