महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिषेक-ऐश्वर्याच्या लग्नातील बच्चन यांचा फोटो होतोय व्हायरल - amitabh Bachan

ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांचे लग्न ७ वर्षापूर्वी झाले होते. या विवाहाचे काही दुर्मिळ फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अमिताभ आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा

By

Published : Aug 22, 2019, 5:05 PM IST


मुंबई - बॉलिवूडमधील सुंदर जोडपे ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांचे लग्न ७ वर्षापूर्वी झाले होते. तत्कालिन हायप्रोफाईल ठरलेल्या या लग्नाला मोजकेच सेलेब्रिटी उपस्थित होते. या विवाहाचे काही दुर्मिळ फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ऐश्वर्या अभिषेक यांच्या लग्नाचे हो फोटो प्रसिध्द ड्रेस डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ड्रेस डिझायनर यांची ही जोडी गेली ३३ वर्षे इंडस्ट्रीमध्ये आपली सेवा करीत आहे.

बच्चन परिवारातील विवाहाचे हे दुर्मिळ फोटो चाहत्यांसाठी पर्वणी ठरत आहेत. या फोटोत संपूर्ण बच्चन फॅमिली डिझाईन्ड पांढऱ्या वस्त्रात दिसत आहेत. यातील सर्वच फोटो सुंदर असले तरी अमिताभ आणि त्यांची मुलगी श्वेता नंदा यांचा डान्स करतानाचा फोटो चाहत्यांचे आकर्षण बनला आहे.

हे सुदर फोटो ड्रेस डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ''परिकथेत शोभणारा विवाह''. २० एप्रिल २००७ मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा विवाह पार पडला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details