महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘टकाटक’च्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे घेऊन येतोय 'एक नंबर'!

‘टकाटक’ च्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे 'एक नंबर' घेऊन येतोय ज्यात मनोरंजन असेल 'एक नंबर'. २०१९मध्ये मराठी तिकिटबारीवरील सर्व गणितं बदलत धुमाकूळ घालणाऱ्या 'टकाटक'चं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली 'एक नंबर' बनला असल्यानं या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

दिग्दर्शक मिलिंद कवडे घेऊन येतोय 'एक नंबर'!
दिग्दर्शक मिलिंद कवडे घेऊन येतोय 'एक नंबर'!

By

Published : Nov 16, 2021, 10:39 PM IST

महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडल्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रदर्शन-घाई सुरु झाली आहे. हिंदी-इंग्रजीप्रमाणेच मराठी बॅाक्स ऑफिसवरही आता नवीन चित्रपटांचा हंगाम सुरू झाला आहे. लक्षवेधी मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांसोबतच मराठी सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय ठरलेला 'एक नंबर' हा मराठी चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘टकाटक’ च्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक मिलिंद कवडे 'एक नंबर' घेऊन येतोय ज्यात मनोरंजन असेल 'एक नंबर'. २०१९मध्ये मराठी तिकिटबारीवरील सर्व गणितं बदलत धुमाकूळ घालणाऱ्या 'टकाटक'चं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली 'एक नंबर' बनला असल्यानं या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

यापूर्वी मीडियामध्ये प्रकाशित झालेल्या सकारात्मक बातम्यांमुळं प्रेक्षकांमध्ये 'एक नंबर' बाबत कमालीची उत्सुकता आहे. 'एक नंबर'चं लक्षवेधी मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आल्यानंतर चित्रपटाबाबतचं कुतूहल अधिकच वाढलं, पण आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. मिलिंद कवडे यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या मनोरंजक चित्रपटांप्रमाणे यातही परीपूर्ण मनोरंजन करणारं कथानक पहायला मिळेल. 'एक नंबर'ची ए-वन कथा, पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली असून, संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे.

मिलिंद कवडेंच्या या चित्रपटात पुन्हा एकदा प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून, मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी या कलाकारांही विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पटकथा सहाय्यक संजय नवगिरे आणि सुनिल मगरे आहेत, तर डिओपी हजरत शेख (वली) यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. गीतकार जय अत्रेनं लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरूण लिखते यांनी स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिलं असून, संकलन प्रणव पटेल यांनी केलं आहे.

'एक नंबर'बाबत मिलिंद म्हणाले की, ‘या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी फुल टू पैसा वसूल चित्रपट घेऊन आलो आहोत. सर्व वयोगटातील प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटातील कॅरेक्टर्स प्रेक्षकांना कुठे ना कुठे तरी पाहिल्यासारखी वाटतील आणि ते 'एक नंबर'च्या कथानकाशी रिलेट करतील. आशयघन कथानकाला सुमधूर गीत-संगीताची किनार जोडून तयार करण्यात आलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे.’

निर्माते महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं तयार केलेल्या 'एक नंबर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘एक नंबर'च्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी २८ जानेवारी २०२२ हा मुहूर्त निवडला आहे.

हेही वाचा - 'सुमन एंटरटेन्मेंट'च्या पहिल्या हिंदी गाण्यात झळकणार मराठी अभिनेत्री पूजा सावंत!

ABOUT THE AUTHOR

...view details