'मिशन मंगल’ चित्रपटाला मनसेच्या खळ्ळखट्याकपुढे नमते घेणे भाग पडले आहे. हा सिनेमा मराठीत डब होऊन रिलीज होणार होता. याला मनसेच्या चित्रपट सेनेने विरोध केला होता. अखेर चित्रपटाच्या निर्मात्याने माघार घेतली असून हा चित्रपट आता हिंदीतच रिलीज होणार आहे.
मिशन मंगल चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार असल्यामुळे मराठी चित्रपटांसाठी थिएटर्स मिळण्यास अडचण होणार होती. यामुळे मनसेने याला प्रखर विरोध करीत खळ्ळखट्याकचा इशारा दिला होता.