मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेता दुलकीर सलमानने गुरुवारी सांगितले की त्याची सौम्य लक्षणांसह कोरोनाव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काही दिवसापूर्वी त्याचे वडील मामुटी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सलमानने घेतलेल्या कोविड चाचणीत तो पॉझिटिव्ह ठरला आहे.
सलमानने ही बातमी शेअर करण्यासाठी त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलचा वापर केला. त्याने थोडक्यात लिहिलंय की तो आता आयसोलेशनमध्ये रहात आहे.
"मी नुकतीच कोविड 19 ची पॉझिटिव्ह चाचणी केली आहे. मी घरी वेगळेा रहातआहे आणि मला फ्लूची सौम्य लक्षणे आहेत पण अन्यथा मी ठीक आहे. जे लोक गेल्या काही दिवसांपासून शूट दरम्यान माझ्या जवळच्या संपर्कात होते, त्यांनी वेगळे रहावे आणि कोविड चाचणी करुन घ्यावी.'', असे सलमानने लिहिले आहे.