मुंबई- विरु देवगण यांच्या निधनानंतर देवगण परिवार शोक सागरात बुडाला आहे. २७ मे ला त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यविधी दरम्यान अभिनेत्री काजोलही भावनाविवश होऊन रडत होती. त्यांच्या दुःखाचा सागर अजून संपला नसल्याचे दिसतंय. विरु देवगण यांच्या निधनाच्या एक दिवसानंतरच काजोल मुंबईच्या लिलावती रुग्णालयात जाताना दिसली. ती तिच्या आजारी आईला भेटायला गेली होती.
सासऱ्याच्या निधनानंतर रुग्णालयात का दिसून आली अभिनेत्री काजोल? - Ajay Devgan
अजय देवगणचे वडील विरु देवगण यांच्या निधनानंतर काजोल प्रचंड उदास होती. सासऱ्यावर अंत्यविधी झाल्यानंतर ती लीलावती रुग्णालयात दिसून आली. तिची आई तनूजा यांच्यावर इथे उपचार सुरू असल्याचे समजते.
अभिनेत्री काजल फोटो इन्स्टाग्रामच्या सौजन्याने
मिळालेल्या माहितीनुसार, काजोलची आई अभिनेत्री तनूजा या आजारी असून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नेमके काय झाले याचा खुलासा झालेला नाही. सोमवारी सकाळी देवगण परिवाराने विरु देवगण यांच्या निधनाची बातमी दिली होती.
सध्या काजोल ही अभिनेता अजय देवगण यांच्या आगामी चित्रपट 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटात गेस्ट रोल करण्याच्या तयारीला लागली आहे. अलीकडे काजोल प्रदीप सरकार यांच्या 'हेलिकॉप्टर ईला' या चित्रपटात झळकली होती.