महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जैसलमेरमध्ये घुमला साउंड, कैमरा आणि अ‌ॅक्शनचा आवाज - स्वर्णनगरी सितारों से गुलजार जैसलमेर

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जैसेलमेर चित्रपट कलाकारांनी गजबजून गेले आहे. सुंदरता आणि मन मोहून टाकणाऱ्या दृश्यांमुळे बॉलिवूडसह दक्षिण भारतीय चित्रपट कलाकारांनाही जैसलमेरची भूरळ पडली आहे.

जैसलमेरमध्ये घुमला साउंड, कैमरा आणि अ‌ॅक्शनचा आवाज
जैसलमेरमध्ये घुमला साउंड, कैमरा आणि अ‌ॅक्शनचा आवाज

By

Published : Jan 3, 2021, 10:08 AM IST

जैसलमेर- सुवर्णनगरी समजल्या जाणाऱ्या या शहरात कित्येक महिन्यानंतर साउंड, कैमरा आणि अ‌ॅक्शनचा आवाज घुमला. कोरोनामुळे जैसलमेरमध्ये कोणत्याही चित्रपटाची शुटिंग करण्यात आली नव्हती. मात्र, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चित्रपट कलाकारांनी हे शहर फूलून गेले आहे. सुंदरता, मन मोहून टाकणारे दृश्यांमुळे हॉलीवूड, बॉलीवूडसह दक्षिण भारतीय चित्रपट कलाकारांनाही या शहराची भूरळ पडली आहे.

हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात

शनिवारी साजिद नाडियाडवाला यांच्या बच्चन पांडे चित्रपटाच्या चित्रीकरणाला जैसलमेरमध्ये सुरुवात झाली. अभिनेता अरसद वार्सी, किर्ती सेननसह साजिद नाडियाडवालाही जैसलमेरमध्ये दाखल झाले आहेत. जवळपास २ महिन्यांपर्यंत या चित्रपटाचे चित्रीकरण चालणार आहे. यासाठी हॉटेल सूर्यागढमध्ये २ जानेवारी ते २ मार्चपर्यंत खोल्या बूक करण्यात आल्या आहेत. या चित्रपटात अक्षय कुमारची मुख्य भुमिका असून येत्या २ दिवसात अक्षयही जैसलमेरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

करण जोहर आणि यश बॅनरच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांचेही लवकरच चित्रीकरण

येत्या काळात करण जोहरचा बहूप्रतिक्षित चित्रपट तख्त आणि यशराज बॅनरचा आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच जैसलमेरमध्ये सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच करण जोहर जैसलमेरच्या यात्रेदरम्यान चित्रिकरणासाठी स्थळांची पाहाणी करुन गेला होता. तर मागच्या वर्षी हॉलीवूड कलाकार जैकी चानचा वेनगार्ड चित्रपटाचे चित्रीकरणही करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details