महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

तब्बल 22 वर्षांनी अजय देवगण अन् संजय लीला भन्साळी आले एकत्र - आलिया भट बातमी

आलिया भट अभिनित ‘गंगूबाई काठियावाडी‘ हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत असून यात त्यांनी एका महत्वपूर्ण भूमिकेसाठी अजय देवगण ला विचारले होते. खरंतर अजय बऱ्याच चित्रपटांतून काम करतोय व निर्मितीबरोबरच ‘मे-डे’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. तरीही त्याने या चित्रपटासाठी होकार कळवला असून 27 फेब्रुवारीपासून अजय या चित्रपटासाठी काम सुरू करणार आहे.

अजय देवगण
अजय देवगण

By

Published : Feb 27, 2021, 4:45 AM IST

मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय (बच्चन) सोबत अजून एक तगडा कलाकार होता आणि तो म्हणजे अजय देवगण. हा सिनेमा तब्बल 22 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि हिटही झाला होता. आता संजय लीला भन्साळी आणि अजय देवगण तब्बल 22 वर्षांनी पुन्हा एकत्र काम करत आहेत. आलिया भट अभिनित ‘गंगूबाई काठियावाडी‘ हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत असून यात त्यांनी एका महत्वपूर्ण भूमिकेसाठी अजय देवगण ला विचारले होते. खरंतर अजय बऱ्याच चित्रपटांतून काम करतोय व निर्मितीबरोबरच ‘मे-डे’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. तरीही संजय लीला भन्साळी यांच्याबद्दल प्रेम आणि आदर असल्यामुळे त्याने ‘गंगूबाई काठियावाडी‘साठी होकार कळविला होता. आता 27 फेब्रुवारीपासून अजय या चित्रपटाचे शूट सुरू करत आहे.

अजय देवगण गंगूबाई काठियावाडीच्या शुटिंगला सुरुवात करणार आहे याची पुष्टी अधिकृत सूत्रांकडून करण्यात आली असून तो त्याबाबत उत्साही आहे. गंगूबाई काठियावाडीच्या नुकत्याच झालेल्या टीझर लाँचिंगमुळे या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा झाली आणि ‘गंगुबाई’ बद्दल बरीच अपेक्षाही निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीझरमधील तिचा अभिनय सर्वांनाच मंत्रमुग्ध करतो. तिच्यासोबत अजय देवगणच्या भूमिकेबद्दलही उत्सुकता आणि अपेक्षा वाढली असून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर या दोन टॅलेंटेड कलाकारांची अभिनय-जुगलबंदी बघायला नक्कीच आवडेल. अजय देवगण आणि आलिया भट पहिल्यांदाच स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत.

संजय लीला भन्साळी आणि डॉ. जयंतीलाल गाडा (पेन स्टुडिओ) निर्मित ‘गंगूबाई काठियावाडी’ यावर्षी 30 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा -'मुंबई सागा'चा अॅक्शन पॅक्ड ट्रेलर प्रदर्शित

ABOUT THE AUTHOR

...view details