महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आफताब शिवदासानी आणि निन दुसांज यांनी स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची केली घोषणा - आफताब ‘पॉयजन 2’ या वेब सिरीजमध्ये झळकणार

आफताब शिवदासानी आणि निन दुसांज यांनी स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची घोषणा केली आहे. चित्रपट, ऑनलाइन कार्यक्रम आणि माहितीपटांसह विस्तृत आशय असलेल्या कार्यक्रमांची निर्मिती करणे या कंपनीचे उद्दिष्ट असेल.

Aftab Shivdasani, Nin Dusanj l
आफताब शिवदासानी आणि निन दुसांज

By

Published : Jul 20, 2020, 3:04 PM IST

मुंबई -अभिनेता आफताब शिवदासानी आणि पत्नी निन दुसांज शिवदासानी यांनी सोमवारी आपली प्रॉडक्शन कंपनी माउंट झेन मीडिया लॉन्च केली. चित्रपट, ऑनलाइन कार्यक्रम आणि माहितीपटांसह विस्तृत आशय असलेल्या कार्यक्रमांची निर्मिती करणे या कंपनीचे उद्दिष्ट असेल.

'मिस्टर इंडिया' (१९८७) या साय-फाय चित्रपटाद्वारे बाल कलाकार म्हणून आफताबने चित्रपटसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यानंतर 1999 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या म्यूझिकल रोमान्स चित्रपट 'मस्त'मधून मुख्य भूमिकेतून पदार्पण केले आणि विक्रम भट्टच्या सस्पेन्स थ्रिलर 'कसूर' या चित्रपटात तो झळकला होता.

अभिनेता आफताब शिवदासानी यांने आवारा पागल दिवाना, मस्ती, हंगामा यासह अनेक मल्टीस्टारर्समध्ये काम केले आणि २००९ मध्ये तो 'आओ विश करें' या चित्रपटाचा निर्माता बनला. आफताबने सांगितले की तो आणि निन दोघेही बर्‍याच काळ पूर्ण निर्मितीमध्ये येण्याची वाट पाहत होते.

हेही वाचा - बर्थडे स्पेशल: नसीरुद्दीन शहा यांच्या जबरदस्त अभिनय प्रवासाची झलक पहा

आधुनिक, समकालीन आणि आकर्षक असा आशय विकसित करण्याचा हा काळ अतिशय रोमांचक आहे. २० वर्षांपेक्षा जास्त काळ इंडस्ट्रीमध्ये राहिल्याने मला कॅमेऱ्यासमोर एक चांगला अनुभव मिळाला आहे आणि चित्रपट निर्मितीमध्ये याचा मौल्यवान उपयोग होणार आहे, असे ४२ वर्षीय आफताब शिवदासानी यांनी सांगितले. निन म्हणाली की, कला, डिझाईन, जाहिरात आणि ब्रँडिंगच्या पार्श्वभूमीवर आल्यामुळे, तिचा अनुभव सिने निर्मितीमध्ये मनोरंजक असेल.

आफताब पुढच्या ‘पॉयजन 2’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details