मुंबई - बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासनी याचा आज वाढदिवस आहे. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' चित्रपटात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'शहंशाह' चित्रपटातही त्याने अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारुनही आफताबच्या करिअरची नौका डगमगत राहिली. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
आफताबने १९९९ साली राम गोपाल वर्माच्या 'मस्त' चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली होती. या चित्रपटात त्याने उर्मिला मातोंडकरसोबत काम केले होते. या चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटासाठी त्याला पुरस्कारही मिळाला होता.