महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मेरे देश की धरती' गाण्याला अदनान सामींचा स्वरसाज, पाहा व्हिडिओ - Adnan Sami version of Mere Desh ki Dharti song

'मेरे देश की धरती' या गाण्याचं माझं व्हर्जन, असं कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

'मेरे देश की धरती' गाण्याला अदनान सामींचा स्वरसाज, पाहा व्हिडिओ

By

Published : Jan 26, 2020, 6:16 PM IST

मुंबई - सुप्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन देशभक्तीवर आधारित असलेलं आयकॉनिक 'मेरे देश की धरती' हे गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या गाण्यावर चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'मेरे देश की धरती' या गाण्याचं माझं व्हर्जन, असं कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ५ हजारापेक्षा अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर, चाहते देखील त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच अदनान सामी यांना 'पद्मश्री' पुरस्कारही जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अदनान यांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details