मुंबई - अभिनेता आदित्य रॉय कपूर लवकरच 'मलंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. मात्र, आदित्यमुळे या चित्रपटाचे शूटिंग लांबले आहे. याचे कारणही आदित्यनेच सांगितले आहे.
सध्या विश्वचषक स्पर्धेचे फिवर सर्वत्र पाहायला मिळतेय. आज लंडन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड हा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी आदित्यने शूटिंगमधून ब्रेक घेतलाय. त्याचे मित्र आणि कुटुंबीय सुद्धा हा सामना लाईव्ह पाहणार आहेत.
सध्या आदित्यकडे बरेचसे प्रोजेक्ट आहेत. तरीही तो सेमीफायनलसाठी शूटिंगमधुन वेळ काढून लंडनला रवाना झाला आहे. आदित्यने त्याच्या 'मलंग' चित्रपटाचे ९० टक्के शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशा पटाणीदेखील झळकणार आहे. तसेच दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या 'सडक' चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही तो दिसणार आहे.
आदित्यचा काही महिन्यांपूर्वीच 'कलंक' चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. आलिया भट्ट, वरूण धवन, माधुरी दिक्षीत, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा अशी तगडी स्टारकास्ट असूनही या चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.