महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'या' सुंदर ठिकाणी ऐन्जॉय करतेय अदिती गोवित्रिकर, लवकरच करणार शूटिंग - बॉलीवुड अभिनेत्री अदिति गोवित्रिकर ऋषिकेश पंहुची

अदितीने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. अदनान सामी यांच्यासोबत 'कभी तो नजर मिलाओ' या अल्बममध्ये तिने भूमिका साकारली आहे.

'या' सुंदर ठिकाणी ऐन्जॉय करतेय अदिती गोवित्रिकर, लवकरच करणार शूटिंग

By

Published : Nov 24, 2019, 5:37 PM IST

ऋषिकेश - बॉलीवुड अभिनेत्री अदिति गोवित्रिकरने अलिकडेच ऋषिकेश येथे हजेरी लावली होती. आपल्या अभिनयासोबतच ती योगा आणि ध्यान यावरही लक्ष केंद्रीत करत असते. अलिकडेच ती ऋषिकेश येथे रवाना झाली. या ठिकाणाची तिला भूरळ पडली आहे. लवकरच ती येथे शूटिंग करणार असल्याचंही बोललं जात आहे.

आपल्या प्रोफेशनल करिअरमध्ये कामाचा प्रचंड तनाव असतो. तो दुर करण्यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी एकदा तरी जाऊन यावे, असे तिने म्हटले आहे. आपला तनाव दुर करण्यासाठी योगा आणि ध्यान हे योग्य पर्याय आहेत.

अदिती गोवित्रिकर

आजकालच्या दगदगीच्या आयुष्यात निरोगी आणि तणावरहीत राहण्यासाठी योगा अतिशय आवश्यक आहे. ऋषिकेश येथील सौंदर्य पाहून ती हरखून गेली होती. तिने ऋषिकेशची प्रशंसा करत हे अतिशय सुंदर ठिकाण असल्याचं म्हटलं आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण आपल्याला आवडल्याचंही तिने म्हटलं आहे.

अदितीने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. अदनान सामी यांच्यासोबत 'कभी तो नजर मिलाओ' या अल्बममध्ये तिने भूमिका साकारली आहे. याशिवाय सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यासोबत ती 'दे दनादन' या चित्रपटातही झळकली होती. याशिवाय ती बऱ्याच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्येही दिसली आहे.

सध्या ती वेब सीरिजवर काम करत आहे. पुढच्या वर्षी तिचा एक चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. 'कोई जाने ना' असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कुणाल कपूर, आमिर खान यांच्या मुख्य भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details