लंडन- अभिनेता आदिल हुसेनने लंडन शहरात आपल्या 'फूटप्रिंट्स ऑन वॉटर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. हा चित्रपट मल्याळम आणि इंग्रजीमध्ये रिलीज होईल. ब्रिटिश-भारतीय चित्रपट निर्माते नथलिया सयाम या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
आदिल म्हणाला, "मला नेहमीच दिग्दर्शकांच्या पहिल्या चित्रपटाचा एक भाग व्हायचं असतं. ते खूप उत्कट असतात आणि पहिल्या चित्रपटासाठीच्या प्रक्रियेला आपला संपूर्ण वेळ देतात. नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. सर्व कारणांमुळे ते माझ्यासाठी खूप खास आहेत. "
हेही वाचा - कोरोना आणि निसर्ग चक्रीवादळाने केले उध्वस्त, पण जिद्दी समीर म्हात्रेने घेतली पुन्हा भरारी