मुंबई - संकर्षण कऱ्हाडे एका रियालिटी शोमधून मनोरंजनसृष्टीत दाखल झाला. उत्कृष्ट कविता करणाऱ्या संकर्षणने अभिनयातही आपली छाप सोडली आहे. त्याच्या पाठोपाठ त्याचा भाऊ अधोक्षज यानेही मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवले. आता नुकत्याच सुरु झालेल्या स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ ( Pinkicha Vijay Aso ) या मालिकेत संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो बंटी हे पात्र साकारत असून त्यासाठी तो खूपच उत्सुक आहे. बंटी हा पिंकीचा अगदी जवळचा मित्र, पहिल्यांदा मैत्री आणि कालांतराने एकतर्फी प्रेम करणारा मस्तमौला तरुण.
Pinkicha Vijay Aso : ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत अधोक्षज कऱ्हाडे साकारतोय मस्तमौला तरुण - पिंकीचा विजय असो मालिकेत अधोक्षज कऱ्हाडे
स्टार प्रवाहवरील ‘पिंकीचा विजय असो’ ( Pinkicha Vijay Aso ) या मालिकेत संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो बंटी हे पात्र साकारत असून त्यासाठी तो खूपच उत्सुक आहे.
आपल्या अनोख्या भूमिकेविषयी सांगताना अधोक्षज म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत याआधी छोटी मालकीण आणि लक्ष्य या मालिकांमध्ये मी काम केलं आहे. त्यामुळे बंटी साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असेल. मालिकेची टीम खूप भन्नाट आहे. त्यामुळे काम करताना मजा येतेय. आम्ही साताऱ्यातल्या एका गावात काम करतोय. त्यामुळे प्रेक्षकांचाही छान प्रतिसाद मिळतोय. बंटी हे अतिशय कलरफुल पात्र आहे. आमची पटकथा लेखिका श्वेता पेंडसेने खूप उत्तमरित्या ते मला समजावलं आहे. पिंकीवर मनापासून प्रेम करणारा आणि सतत तिच्यासाठी धडपडणारा असा हा बंटी.’
हेही वाचा -काश्मीरमध्ये मायनस २ अंश सेल्सिअसमध्य पोहताना सारा अली खान