नाशिक - वेब सीरिज आणि यू-ट्यूबमुळे मुलांमध्ये विकृती वाढत असून यावर निर्बंध घालणं गरजेचं असल्याचं ठाम मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. नाशिक येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या माध्यमांशी बोलत होत्या.
वेब सीरिजवर सेन्सॉर नसल्यामुळे त्यामध्ये दाखवण्यात येणाऱ्या दृश्यांमुळे मुलांमध्ये विकृती वाढत चालली आहे. यू- ट्यूबवरील व्हिडिओंमुळेही त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून सरकारने याकडे लक्ष देऊन वेबसीरिजवर निर्बंध घालावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -ईसाई धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी फराह खान, रवीना टंडन, भारती यांच्याविरोधात तक्रार दाखल