पुणे- मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आज वाढदिवस. मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची चुणुक सोनालीनं दाखवली आहे. सोनालीनं आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, वायसीएम रुग्णालयाला ९५ पीपीई किट भेट दिले.
सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी, भाऊ अतुल कुलकर्णी व कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आज वायसीएम रुग्णालयाला भेट देत डॉक्टर राजेंद्र वाबळे व भांडार व्यवस्थापक राजेश निकम यांना प्रत्यक्ष भेटून किट त्यांच्याकडे सुपूर्त केले. सद्या सोनाली कुलकर्णी लॉकडाऊनमुळे दुबई येथे अडकली आहे. यामुळे याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकली नाही.
सोनालीने एका व्हिडिओच्या माध्यमातून संदेश पाठवला आहे. यात ती म्हणते, 'जे खरे वॉरियर्स आहेत, त्यांचे रक्षण व्हावे या हेतूने मी हे किट भेट म्हणून देत आहे. वायसीएम रुग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी चांगल्या प्रकारे रुग्णांची काळजी घेत आहेत. त्यामुळे मी ही माझी जबाबदारी समजून छोटीशी मदत करीत आहे, हे किट देताना माझे सहकारी कलाकार यांनीही मला मदत केली आहे.