महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा, अभिनेत्री रेखा अन् त्यांच्या बहिणींचा गोतावळा - Actress Rekha with her sisters photo viral

अभिनेत्री रेखा यांच्या सहा बिहिणींसोबतचा फोटो सध्या चर्चेत आहे. यात रेखा, एक सख्खी बहीण आणि पाच सावत्र बहिणींसोबत आहे.

रेखाअँड सिस्टर्स

By

Published : Sep 23, 2019, 11:18 PM IST

रेखा यांचा एक फोटो सध्या खूप चर्चेत आहे. यात त्या आपल्या अर्ध्या डझन बहिणींसोबत दिसत आहे. यात त्यांची एक सख्खी बहीण आणि पाच सावत्र बहिणी आहेत. दिवंगत तामिळ सुपरस्टार जेमेनी गणेशन यांच्या या सर्व मुली आहेत.

रेखा यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हा फोटो काही काळापूर्वी प्रसिध्द झाला होता. सर्व गणेशन सिस्टर्स या ग्रुप फोटोत दिसतात. यामध्ये रेखा यांच्या शेजारी सख्खी बहीण राधा गणेशन दिसत आहे. इतर त्यांच्या सावत्र बहिणी आहेत. या फोटोत डावीकडून डॉ. जया श्रीधर, रेवती स्वामीनाथन, डॉ. कमला सेल्वराज, रेखा गणेशन, राधा, नारायणी गणेशन, विजया चामुंडेश्वरी अनुक्रमे उभ्या आहेत.

रेखा यांना दोन सावत्र आई होत्या. जेमेनी गणेशन यांची दुसरी पत्नी पुष्पावली यांची रेखा मुलगी आहे. गणेशन यांचा पहिला विवाह अलामेलु यांच्याशी झाला. पुष्पावली यांच्यानंतर जेमेनी यांनी सावित्री या प्रसिध्द तामिळ अभिनेत्रीशी तिसरा विवाह केला होता.

रेखा यांना वडिलांचे प्रेम फारसे मिळालेच नाही. इतकेच नाही तर त्यांना जेमेनी मुलगी मानण्यासही तयार नव्हते. रेखा यांनी जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा ही वेदना त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details